अनंत अंबानी (Anant Ambani Wedding) व राधिका मर्चंट १२ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील सेलिब्रिटी, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच उद्योग विश्वातील अनेक पाहुणे या लग्नाला उपस्थित राहिले.

अनंत व राधिका यांचे लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडले. त्यांच्या लग्नाचे सर्व सोहळे जवळपास दोन आठवडे सुरू होते. त्यांच्या लग्नानंतर शुभ आशीर्वाद सोहळा व रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहिले होते. या लग्नाची जगभरात चर्चा झाली, बरेच लोक या लग्नात करण्यात आलेला खर्च व सेलिब्रेशन यावरून टीका करत आहेत. अनेक पाकिस्तानी देखील अनंत-राधिकाच्या लग्नाला ट्रोल करत आहेत, त्यांना आता सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्याने घरचा आहेर दिला आहे.

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

नौमान एजाजची पोस्ट

अभिनेता नौमान एजाज याने त्याचा एक हसणारा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अंबानींच्या लग्नावर टीका करणाऱ्यांना उद्देशून कॅप्शन लिहिलं आहे. “मला एक गोष्ट कळत नाही की अंबानींच्या लग्नावर टीका करणारे तुम्ही कोण आहात…खुशी त्यांची, लग्न त्यांचे, पैसे त्यांचे आणि आनंदही त्यांचा. तुम्ही इतके दूर बसून त्यांचा आनंद व त्यांच्या पैशांवर टीका करत आहात. तुम्हाला का इतकी चिंता आहे? ते आनंदी असलेले तुम्हाला आवडत नसेल तर दुर्लक्ष करा. मत मांडणं तुमचा अधिकार नाही. त्यामुळे कमेंट्स करणं थांबवा आणि दुआ करा की तुम्हालाही अल्लाह त्यांच्यासारखं लग्न परवडेल इतकं श्रीमंत करेल.”

Radhika Merchant Wedding Look: अंबानींच्या धाकट्या सूनबाईंचा शाही थाट, पाहा राधिका मर्चंटचे खास Photos

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नौमानच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘त्यांनी खूप मेहनतीने पैसा कमावला आहे आणि ते मुलाच्या लग्नावर खर्च करत आहेत. त्यामुळे टीका करणाऱ्यांनीही पैसा कमवावा आणि खर्च करावा,’ ‘तुम्ही अगदी खरं बोललात,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Anant Ambani Radhika Merchant
अनंत अंबानी व राधिका मर्चंट

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे भारतातील सर्व समारंभ आता संपले आहेत. पण अंबानी कुटुंब लंडनमध्ये या दोघांच्या लग्नानिमित्त एक पार्टी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र अद्याप त्याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader