पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने ट्वीटमध्ये भारताचे पंतप्रधान आणि ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर एजन्सीविरुद्ध तक्रार करायची असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटला दिल्ली पोलिसांनी उत्तर दिले आहे. दिल्ली पोलिसांच्या या उत्तराने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा- बॉयकॉट ट्रेण्डबद्दल मधुर भांडारकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “सुशांतच्या मृत्यूनंतर…”

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

सहार शिनवारी नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने एक ट्वीट शेअर केले आहे. सहारने ट्वीटमध्ये लिहिले आहे, “दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहीत आहे का? माझ्या पाकिस्तान या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवणारे भारताचे पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर एजन्सी रॉ यांच्याविरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. मला खात्री आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल.” तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सहार शिनवारीच्या ट्वीटला दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तरात म्हटले आहे, “आम्हाला पाकिस्तानमध्ये अधिकार क्षेत्र नाही. पण तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्वीट करीत आहात? हे जाणून घ्यायला आवडेल!” दिल्ली पोलिसांच्या या उत्तराची सगळीकडे चर्चा होत आहे.

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही इम्रान खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पीटीआयने वकिलांचा व्हिडीओ ट्वीट करीत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात वकील मुसरत यांनी इम्रान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात निदर्शने सुरू झाली. त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशभरातील सोशल मीडिया आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Story img Loader