भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. आता फक्त भारतात नाही जगभरातून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, या सगळ्यात पाकिस्तानच पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
इम्रान खान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. “लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना आनंद मिळाला”, असे ट्वीट केले होते.
आणखी वाचा : “जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल
आणखी वाचा : लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूरचे नाते काय माहित आहे का?
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.