कलाकार मंडळींचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. आता असाच एक अभिनेता त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानने आपण पत्नी अलीजापासून विभक्त होत असल्याचं सोशल मीडियाद्वारे जगजाहिर केलं. एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर फिरोजच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. आता फिरोजच्या पत्नीने त्याचा खरा चेहरा समोर आणण्याचं ठरवलं आहे.

सध्या फिरोज-अलीजाच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. यादरम्यान अलीजाचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अलीजाला दुखापत झाली असल्याचं दिसून येत आहे. हातालाही दुखापत झाल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

अलीजाचे हे फोटो पाहिल्यानंतर फिरोजने तिला मारहाण केली असल्याचं स्पष्ट होत आहे. रुपेरी पडद्यावर फिरोज एक उत्तम अभिनेता असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो वेगळाच असल्याचं स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी अलीजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पत्र शेअर केलं होतं.

आणखी वाचा – Video : भांडूपच्या चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

“लग्नाची चार वर्ष मला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. शारीरिक तसेच मानसिक हिंसाचारासह ब्लॅकमेलिंग आणि पतीकडून होणारा अपमान सहन करावा लागत होता. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मी माझं पुढचं आयुष्य घाबरून जगू शकत नाही. माझ्या मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी हा निर्णय घेत आहे.” असं अलीजाने म्हटलं होतं. पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये फिरोजच्या नावाचाही समावेश आहे. मात्र सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे फिरोजचे चाहतेही त्याच्यावर टीका करत आहेत.

Story img Loader