शाहरुख खान चांगला दिसत नाही व तो चांगला अभिनेता नाही, असं मत पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने व्यक्त केलं आहे. शाहरुख खान एक हुशार उद्योगपती आहे आणि त्याला स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे हे माहीत आहे. पण शाहरुखला अभिनय येत नाही, असंही महनूरने म्हटलं आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार महनूर म्हणाली, “शाहरुख खानचे व्यक्तिमत्त्व खूप चांगले आहे, परंतु सौंदर्याच्या पॅरामीटर्सनुसार तुम्ही त्याला पाहिल्यास तो देखणा नाही. फक्त त्याचे व्यक्तिमत्त्व इतके मजबूत आहे की तो चांगला दिसतो. पण असे अनेक सुंदर लोक आहेत, ज्यांना व्यक्तिमत्त्व नसल्याने कोणी त्यांच्याकडे पाहतही नाही.”
“शाळेत राडे झाले होते”, माधुरी पवारने सांगितला पहिल्या लव्ह लेटरचा किस्सा; म्हणाली, “मुलाचं नाव…”
ती पुढे म्हणाली, “शाहरुख खानबद्दल माझं मत आहे की त्याला अभिनय येत नाही. तो एक उत्तम उद्योगपती आहे, त्याला स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे हे माहीत आहे. कदाचित त्याचे चाहते आणि लोक माझ्याशी असहमत असतील, पण ठीक आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व चांगलं आहे, तो स्वत:चं चांगलं मार्केटिंग करतो. असे अनेक चांगले कलाकार आहेत, जे तितकेसे यशस्वी नाहीत.”
दरम्यान, महनूर तिच्या या वक्तव्यानंतर खूप ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी तिला तुझं मत कोणीही विचारत घेत नसल्याचं म्हणत आहे. तर काहींनी शाहरुख खानबद्दल अशी वक्तव्ये करून तिला प्रसिद्धी मिळवायची असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.