गेल्या काही वर्षांपासून सातव्या महिन्यानंतर प्रेग्नंन्सी फोटोशूट करण्याचा ट्रेंड आला आहे. अनेक अभिनेत्री सातत्याने हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. त्याबरोबरच अनेक सर्वसामान्य लोकही प्रेग्नंन्सी फोटोशूट करताना दिसत आहे. नुकतंच पाकिस्तानमधील एका अभिनेत्रीने प्रेग्नंन्सी फोटोशूट केले होते. यामुळे तिला ट्रोल करण्यात आले. मात्र नुकतंच तिने यावरुन सडेतोड उत्तर दिले आहे.
पाकिस्तानमधील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अरमीना खान हिला ओळखले जाते. ती कायमच तिचे बोल्ड आणि आकर्षक फोटो शेअर करत असते. सध्या ती गरोदरपणाचा आनंद घेत आहे. अलीकडेच तिने प्रेग्नंन्सी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला
तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना म्हटले की, “ज्या ज्या लोकांनी मला चिडवलंय त्या लोकांना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी तुमच्यावर फार हसत आहे. बिचारे लोक सकाळपासून माकडांसारखे उड्या मारतात. पण महिला आणि पुरुषांनो हे काही विमानतळ नाही. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या येण्याजाण्याचे तपशील देण्याची अजिबात आवश्यकता नाही. धन्यवाद”, असे तिने म्हटले.
त्याबरोबरच तिने पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले. “खरं सांगायचं झालं तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलू इच्छिते. माझ्याकडे सध्या तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त काहीही नाही. अनेक नेटकरी त्यांच्या फेक अकाऊंटवरुन कमेंट करत ट्रोल करतात. पण मी आज फक्त आणि फक्त माझ्या शुभचिंतकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्या प्रियजनांचे धन्यवाद”
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
दरम्यान अरमीना खानने काही दिवसांपूर्वी तिचे बेबी बंप प्लॉन्ट करताना काही फोटो शेअर केले होते. यात तिने राखाडी रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याबरोबर तिने जांभळ्या रंगाच्या सॅटिन कपड्यातही तिने फोटोशूट केले होते. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र तिचा हा लूक अनेक युजर्सला अजिबातच आवडलेला नाही. अनेकांनी यावरुन तिला ट्रोल केले आहे.