प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने तिच्या देशातील काही समस्यांवर प्रकाश टाकला आहे. पाकिस्तानमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल तिने भाष्य केलं आहे. तसेच देशात महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणं नसल्याबद्दल आयशाने चिंता व्यक्त केली आहे.

अदनान फैझलबरोबर पॉडकास्टमध्ये संवाद साधताना आयशाने पाकिस्तानमधील महिलांच्या परिस्थितीवर तिची मतं मांडली. “मला इथं सुरक्षित वाटत नाही. मला रस्त्यावर चालायचं आहे, मला कारमध्ये बसून न राहता मोकळेपणाने रस्त्यांवर सायकल चालवायची आहे. बाहेर मोकळ्या हवेत चालणं ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे मी रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकत नाही,” असं आयशा म्हणाली.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

आयशा पुढे म्हणाली, “इथे मला नेहमीच मानसिक त्रास आणि चिंता जाणवते. पाकिस्तानी स्त्री कोणत्या वातावरणात वाढत आहे हे इथला पुरुष कधीच समजू शकत नाहीत. ज्यांना मुली, बहिणी, बायको, आई आहेत ते समजू शकतात. पण हा त्रास एका स्त्रीशिवाय कुणालाही जाणवू शकत नाही. इथे प्रत्येक क्षणी पाकिस्तानी महिला घाबरत जगत असते.”

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

आयशाने तिला आलेले वाईट अनुभवही सांगितले. “मला कराचीत दोनदा लुटलं गेलं. पाकिस्तानमध्ये तो दिवस कधी येईल जेव्हा मी अपहरण, बलात्कार आणि चोरांच्या भीतीशिवाय आरामदायी जीवन जगू शकेन,” असा प्रश्न तिने विचारला. तसेच स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या मूलभूत मानवी गरजा असल्याचंही तिने नमूद केलं.

Video: “त्याच्या जन्माच्या पाच मिनिटांनंतर मी त्याला…”, नातू अगस्त्यबद्दल अमिताभ बच्चन बोलताना भावुक

आयशाने सांगितलं की तिची आई वयाच्या ३० व्या वर्षी विधवा झाली होती. तेव्हापासून आईने तिला आणि तिच्या भावाला एकटीने वाढवलं, त्या काळात त्यांना पाकिस्तानमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिचा भाऊ कायमचा पाकिस्तान सोडून डेन्मार्कला निघून गेला आहे, आता आयशा आणि तिची आई देखील पाकिस्तान सोडू इच्छित आहे.

Story img Loader