आजवर काही कलाकारांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला आहे. आता यामध्येच आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे. पाकिस्तानी सुप्रसिद्ध अभिनेत्री इमान अलीने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. इमानचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. सुंदर व एकदम फिट दिसणारी इमान एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याबाबत तिने आता स्वतःच खुलासा केला आहे.
आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
४१ वर्षीय इमानने ‘खुदा के लिए’ चित्रपटामधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटामुळे ती प्रकाश झोतात आली. तिचा हा पहिलाच चित्रपट. पण पहिल्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इमानबरोबर एक विचित्र घटना घडली. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत भाष्य केलं आहे.
‘खुदा के लिए’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला अचानक दिसायचंच बंद झालं. या प्रकारानंतर तिने योग्य ती तपासणी केली. तेव्हा आपल्याला Multiple Sclerosis नावाचा आजार असल्याचं इमानला कळालं. या आजारामध्ये व्यक्तीला एका डोळ्याने दिसणं बंद होतं. शरीरामध्ये थकवा जाणवतो. या आजाराबाबत जेव्हा इमानला समजलं तेव्हा तिला धक्काच बसला. गंभीर आजार आहे पण त्यामुळे तिने काम करणं कधीच बंद केलं नाही.
आणखी वाचा – वयाच्या ५६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने ३३ वर्षाने लहान मुलीशी गुपचूप केलं दुसरं लग्न, कारण…
तसेच इमानला नाकासंबंधीतही आजार आहे. या आजारामुळे तिचं तोंड कधीच पूर्ण बंद राहत नाही. तिची बोलण्याची पद्धतही वेगळीच आहे. त्यामुळे ती सतत नशेमध्ये असते असं अनेकांना वाटतं. पण आपण नशेमध्ये नसून तो आजार असल्याचं इमानने या मुलाखतीमध्ये सांगितलं. या आजारांचा सामना करत असताना तिने लग्नही केलं. ती तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप खुश आहे. तिचा आगामी चित्रपट ‘टिच बटन’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.