पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेत्री कुब्रा खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनके चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. कुब्राला बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याच काळात तिला कर्करोगासारख्या भयंकर आजारानेही ग्रासले होते.
कुब्रा खान हिने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी ती म्हणाली, “मला खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा. या वर्षाच्या सुरुवातीला मला कर्करोग होण्याचा धोकाही होता. याबाबत मी चाचणी केली होती. त्यावेळी मला कर्करोगाची एक गाठ झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर तात्काळ मी त्यावर शस्त्रक्रिया केली.”
“जेव्हा मला कर्करोगाचे निदान झाले त्यावेळी मी ‘हम कहाँ के सच थे’ या कार्यक्रमाचे शूटींग करत होती. यावेळी मी फार दु:खी झाली. मी आतून पूर्णपणे तुटली होती. यावेळी कधीकधी मला रडायलाही यायचे. याकाळात माझे वजन प्रचंड वाढले होते. पण त्यावरुन मला अनेकांनी ट्रोल केले. त्यावेळी माझ्या क्षमतेवर आणि कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करायचे. काहींनी तर मला बदनाम करण्यासही सुरुवात केली. यामुळे माझा स्वत:वरचा विश्वास कमी झाला,” असेही कुब्रा म्हणाली.
त्यावेळी मला फार वाईट वाटत होते. मी यातून बरी होत असताना मला डॉक्टरांनी डाएटिंग आणि व्यायाम करण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळेच माझे वजन वाढले होते, असे तिने सांगितले.