पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिने हॅलोविन पार्टीमध्ये काढण्यात आलेल्या तिच्या वादग्रस्त छायाचित्राबद्दल ट्विटरवरून दिलगिरी व्यक्त केली आहे. महिराने तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक असीम रझा याच्यासोबत हे छायाचित्र काढले होते. त्यामध्ये असीम रझा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभुषेत असून त्याच्या हातात ‘महिरा को बाहर निकालो’ अशा आशयचा फलकदेखील दिसत आहे. पाकिस्तानविरोधी भूमिकेवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने काही दिवसांपूर्वी फवाद खान आणि माहिरा खान या पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या एकाही चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रमोशन करू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या वेषातील असीम रझाकडून या पोस्टरद्वारे टिप्पणी करण्यात आली होती. मात्र, या प्रकारानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महिरा खानने लगेचच ट्विटरवरून या छायाचित्राबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या छायाचित्रामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे, असे महिराने ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे. माहिरा खान शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
If I hv hurt anyone’s sentiments w the image at the Halloween, I wd like to apologise as that was not what I intended & was unintentional
— Mahira Khan (@TheMahiraKhan) November 5, 2015
I have always made a concerted effort to maintain this standard for myself. Love and peace to all.
— Mahira Khan (@TheMahiraKhan) November 4, 2015
As many have said before me, artists are creative people who can’t be dragged into the politics of nations.
— Mahira Khan (@TheMahiraKhan) November 4, 2015
It was not done intentionally to hurt anybody’s sentiments, neither to make a political statement.
— Mahira Khan (@TheMahiraKhan) November 4, 2015
The image from a Halloween event I attended has been made out to be something it never was.
— Mahira Khan (@TheMahiraKhan) November 4, 2015