महेश भट्ट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वाचं नाव आहे. त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट बनवले आणि असंख्य कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीत संधी दिली. महेश भट्ट हे त्यांच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत राहिलेच, पण त्याही पेक्षा ते त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेत. त्यांची अनेक वक्तव्येही वादाला तोंड फोडणारी होती. याशिवाय महेश भट्ट यांचे त्यांची मुलगी पूजा भट्ट हिच्याशी संबंध आणि तरुण अभिनेत्रींसोबतच्या कथित लिंकअप्सच्या अनेक बातम्याही आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अभिनेत्री मीराने २००५ साली ‘नजर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांच्या पत्नी सोनी राजदान यांनी केले होते, परंतु चित्रपटाची कथा महेश भट्ट यांनी लिहिली होती. यावेळी महेश भट्ट यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक आरोप मीराने केला होता.

मुस्लीम आई, दोन लग्न, परवीन बाबीशी अफेअर अन् स्वतःच्याच मुलीबरोबर…; महेश भट्ट यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से

कराचीमध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना मीराने महेश भट्टविरोधात काही धक्कादायक खुलासे केले होते. ती म्हणाली, “लोकांनी याबाबतीत बरंच काही लिहिलंय आणि म्हटलंय. पण मी आता गप्प बसणार नाही. आता मी खरं बोलणार आहे. चित्रपटांमध्ये काम करणं बंद करणं हा माझा निर्णय नव्हता, पण महेशजींनी मला भारत सोडायला सांगितलं होतं. माझं प्रसिद्ध होणं आणि इतर दिग्दर्शकांशी संवाद साधणं त्यांना आवडत नव्हतं. एकदा आमच्यात भांडण झाले तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली. त्यानंतर त्यांनी मला पाकिस्तानला परत जाण्यास सांगितलं. मी गेले, पण जेव्हा मला परत भारतात जायचं होतं, तेव्हा त्यांनी मला येऊ दिलं नाही. आता माझ्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही आशा उरली नाहीये, त्यांनी माझे सर्व मार्ग बंद केले.”

टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती

पाकिस्तानी अभिनेत्री मीरा पुढे म्हणाली, “मला वाटलं की त्यावेळी मी प्रसिद्ध होत असल्याने त्यांना ते आवडत नव्हतं. मी इतर कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करू नये, असं त्यांना वाटत होतं. मला राम गोपाल वर्मा, मणी रत्नम, सुभाष घई यांसारख्या बड्या दिग्दर्शकांच्या ऑफर्स आल्या. मात्र त्यांनी त्याला अजिबात दाद दिली नाही. मी फक्त त्याच्या बॅनरला चिकटून राहावे, अशी त्याची इच्छा होती. एका रात्री मला सुभाष घई यांना एका हॉटेलमध्ये भेटायचे होते. याबद्दल मी महेशजींना सांगताच ते त्यांचा राग अनावर झाला व ते माझ्यावर चिडले. त्यांनी मला मारहाण केली होती,” असा धक्कादायक खुलासा या अभिनेत्रीने केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actress meera allegations on mahesh bhatt said he slapped me and blocked my path in bollywood hrc