कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकीय व सामाजिक विषयांवर तिची मतं मांडत असते. पाकिस्तानबद्दलही ती विधानं करत असते. पण पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कंगना रणौतवर जोरदार टीका केली, तसेच कंगनाला कानशिलात मारायला आवडेल, असं विधानही केलं. कंगना पाकिस्तानबद्दल करत असलेली वक्तव्ये आपल्याला अजिबात आवडत नसल्याचं नौशीनने म्हटलंय.
तुला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला भेटायला आवडेल, असा प्रश्न विचारल्यावर नौशीनने कंगना रणौतचं नाव घेतलं आणि तिला कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य केलं. “ज्याप्रकारे ती माझ्या देशाबद्दल काहीही बोलत असते, ज्या प्रकारे ती पाकिस्तानी सैन्याबद्दल खूप वाईट गोष्टी बोलते, मी तिच्या हिंमतीला सलाम करते. तिला काहीही ज्ञान नाही पण ती देशाबद्दल बोलते, तेही दुसऱ्याच्या देशाबद्दल. तू स्वतःच्या देशावर लक्ष केंद्रित कर ना, तुझ्या अभिनयावर, दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित कर, तुमच्या वादांवर आणि एक्स बॉयफ्रेंडवर लक्ष केंद्रित कर,” असं नौशीन म्हणाली.
कंगनाला पाकिस्तानबद्दल माहीत तरी काय आहे? असा प्रश्नही नौशीनने विचारला. “पाकिस्तानमध्ये लोकांशी गैरवर्तन केले जाते हे तुला कसं माहीत? तुला पाकिस्तानी लष्कराबद्दल काय माहिती आहे? तुला आमच्या एजन्सीबद्दल कसं माहीत आहे? आम्हाला स्वतःला माहीत नाही, एजन्सी आमच्या देशात आहेत, सैन्य आमच्या देशाचे आहे, ते या गोष्टी आमच्याशी शेअर करत नाहीत. ते सिक्रेट्स आहेत, हो ना?” असं नौशीन म्हणाली.
नौशीनने कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं, पण तिला इतर लोक किंवा देशांबद्दल आदर नाही, असंही ती म्हणाली.