पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद ही क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्याने चर्चेत आली आहे. सना व शोएब मलिकने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व शोएब मलिक यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याची चर्चा होती. त्याबाबत या दोघांनी बोलणं टाळलं होतं. याच दरम्यान शोएबने थेट लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब मलिकने सना जावेदला इन्स्टाग्रामवर टॅग करत लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच ‘अलहमदुलिल्लाह’ असं कॅप्शन दिलंय. लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केल्यानंतर सनाने तिच्या इन्स्टाग्रामवरील नावात मोठा बदल केला आहे. तिने तिचं सना जावेद हे नाव बदलून ‘सना शोएब मलिक’ असं केलं आहे.

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

सना जावेद प्रोफाईल

शोएब मलिकने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याच्या आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. सानिया अनेकदा घटस्फोटाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या स्टोरीज शेअर करत असते, पण तिने नात्याबद्दल जाहीरपणे विधान केलं नव्हतं. आता शोएबने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्याने सानियाशी नातं संपल्याचं स्पष्ट झालं आहे.

सीमेपलीकडचं प्रेम, लग्न अन् १४ वर्षांनी घटस्फोट; ‘अशी’ होती सानिया मिर्झा-शोएब मलिकची Love Story

सानिया मिर्झा व शोएब मलिक यांनी २०१० मध्ये लग्न केलं होतं. सानिया भारतीय व शोएब पाकिस्तानी असल्याने त्यांच्या लग्नावर बरीच टीका झाली होती. शोएब घटस्फोटित होता, तर सानियाचा साखरपुडा मोडला होता. दोघेही एका मुलाचे पालक असून त्यांचा मुलगा इजहान हा पाच वर्षांचा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actress sana javed changed name on instagram after marrying cricketer shoaib malik hrc