‘कच्चा बदम’ (Kacha Badam) हे गाणे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप गाजत आहे. ‘कच्चा बदाम’ या गाण्याने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. सामान्य जनता काय, सेलिब्रिटी काय! प्रत्येकजण ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर रील शेअर करत आहेत. हे गाणे गायलेला बंगाली शेंगदाणा विक्रेता भुबन बद्यकर रातोरात लोकप्रिय झाला. पण आता हे गाणे पाकिस्तानमध्ये चर्चेत आहे.
कच्च्या बदामाची ‘रमजान’ व्हर्जन (Kacha Badam Ramzan Version)
आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये ‘कच्च्या बदामा’च्या गाण्याचे ‘रमजान व्हर्जन’ समोर आले आहे. एका पाकिस्तानी गायकाला या गाण्याचे रमजान व्हर्जन बनवून भुबनसारखी लोकप्रियता मिळवायची होती. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला आणि लोकांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. ‘कच्चा बदाम’चं हे रीमिक व्हर्जन पाकिस्तानमध्ये व्हायरल झालं आहे. यासिर सोहरवर्दी (Yasir Soharwardi) या यूट्यूबरने हे गाणं गायलं आहे.
यासिर सोहरवर्दीने हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलं आहे. या गाण्यात मांजर आणि पक्षीही गाणं गाताना दिसतात. परंतु नेटकऱ्यांना हे गाणं अजिबात आवडले नाही. यानंतर लोकांनी त्याला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा : “दुश्मन…”, देवेंद्र फडणवीस यांना पाहून एकनाथ खडसेंनी गायलेल्या गाण्याची होतेय चर्चा
‘रोजा रखूंगा’ असे या गाण्याचे नावं आहे. काही लोकांनी यासिरचे त्याच्या गाण्यांचे कौतुकही केले आहे. तर गाण्यात प्राण्यांच्या आवाजाची नक्कल केल्याबद्दल यासिरची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे अनेक म्हणाले. यासिर सोहरवर्दीचा जन्म कराचीमध्ये झाला होता. तो पाकिस्तानमध्ये नावाजलेला YouTuber म्हणून ओळखला जातो. त्याचे विडिओ सतत व्हायरल होत असतात.