Pakistani Celebrities Celebrated Diwali : भारतात सध्या दिवाळी जोशात आणि जोमाने सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीज दिवाळी साजरे केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. परदेशांतही जिथे जिथे भारतीय लोक आहेत, तिथे तिथे ते दिवाळी साजरी करीत आहेत. जगभर दिवाळी साजरी होत असताना पाकिस्तानातील सेलिब्रिटींनीही दिवाळी साजरी केली आहे. पाकिस्तानातील सेलिब्रिटींनी दिवाळी साजरी करीत त्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेत्री सरवत गिलानी, फहाद मिर्झा, सोन्या हुसेन, सनम सईद, मोहिब मिर्झा, तारा महमूद, शहेरयार मुनावर सिद्दीकी, माहिन सिद्दीकी आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी यंदा त्यांच्या देशात दिवाळी साजरी केली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काहींनी त्यांचे दिवाळी सेलिब्रेशन त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या व्हिडीओसह लिहिलेल्या पोस्टमध्ये सेलिब्रिटीजनी खास संदेश दिला आहे.
सरवत, सोन्या, सनम व शहेरयार यांचे दिवाळी सेलिब्रेशन
पाकिस्तानी फॅशन डिझायनर दीपक पेरवानी यांनी या दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. शनिवारी सोन्या हुसेनने तिच्या इन्स्टाग्रामवरून पार्टीमधील एक व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये तिने पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचा आदर करावा आणि त्यांना महत्त्वाचा भाग मानावा, अशी भावना व्यक्त केली. व्हिडीओत सोन्याने विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आणि या सणाचा आनंद घेतला.
पाकिस्तानी सेलिब्रिटींची दिवाळीची झलक
पाकिस्तानी सेलिब्रिटींनी दिवे लावले, फटाके फोडले, गाण्यांवर डान्स केला आणि एकमेकांना व चाहत्यांना ‘हॅपी दिवाळी’ अशा शुभेच्छा दिल्या. सोन्याने लाल साडी आणि कपाळावर टिकली लावलेली होती. सरवत काळ्या-पांढऱ्या साडीत आणि लाल ब्लाऊजमध्ये दिसली. सनम हिरव्या साडीत आणि गुलाबी ब्लाऊजमध्ये सजून आली होती. पुरुष सेलिब्रिटींनीही कपाळावर टिळा लावला होता. शहेरयार हिरव्या कुर्ता-पायजम्यात आकर्षक दिसत होता.
सोन्याचे भावनिक आवाहन
व्हिडीओ शेअर करताना सोन्याने लिहिले, “पाकिस्तान हा संस्कृती आणि श्रद्धांचा सुंदर संगम आहे आणि अल्पसंख्याकांनाही आपण महत्त्वाचा भाग मानून त्यांचे सण साजरे करायला हवेत. मोहम्मद अली जिना म्हणाले होते, ‘तुम्हाला मंदिरात जाण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा पंथाचे असू शकता.’ त्यांच्या या संदेशामुळे मला असं वाटतं की, आपल्या देशातील प्रत्येक समाज देशाला समृद्ध करतो आणि त्यामुळे आपण त्यांच्या हक्कांचं रक्षण करायला हवं. प्रत्येकाला आपला देश हे त्याचं घर आहे, असं वाटायला हवं. आपण सर्वच संस्कृतींचं स्वागत करायला हवं.”
सरवतची पोस्टही चर्चेत
सरवत गिलानीनेही तिचा टिकली लावलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने ‘हॅपी दिवाळी’ म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, “आपल्या झेंड्यातील पांढऱ्या रंगाचा सन्मान करूया आणि एक समावेशक पाकिस्तान तयार करूया.”