इन्स्टाग्राम रील्स, लग्नसमारंभ असो किंवा आयपीएलचे सामने आजकाल सर्वत्र फक्त ‘गुलाबी साडी’ गाण्याची चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या या गाण्याने केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात दबदबा निर्माण केला आहे. धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते आफ्रिकेतल्या किली पॉलपर्यंत प्रत्येकाने ‘गुलाबी साडी’वर डान्स केल्याचे व्हिडीओ चर्चेत आले होते. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून संजूच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची केवढी क्रेझ निर्माण झालीये याचा अंदाज येतो.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचा दावा संबंधित नेटकऱ्याने केला आहे. हा व्हिडीओ एका समारंभातील असून यावर संजू राठोडने देखील कमेंट केली आहे. अमर प्रकाश या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या इन्टाग्राम पेजवरून ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जेव्हा तुम्ही पाकिस्तानमधील मराठमोळ्या लग्नासमारंभात ‘गुलाबी साडी’ साडी गाण्यावर डान्स करता…” असं कॅप्शन या तरुणाने व्हिडीओवर दिलं आहे.

हेही वाचा : गौरव मोरे, कुशल बद्रिकेचा ‘मॅडनेस मचाएंगे’ अवघ्या दोन महिन्यांत होणार बंद? वाहिनीने घेतला मोठा निर्णय

संजू राठोडची खास कमेंट

जळगावच्या संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याला परदेशात पसंती मिळाल्याने सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. स्वत: संजूने या तरुणाच्या व्हिडीओची दखल घेत या व्हिडीओवर मराठी भाषेतूनच कमेंट केली आहे. “खूपच छान” असं गायकाने कमेंट्स म्हटलं आहे. तसेच इतर नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

sanju rathod
संजू राठोडची खास कमेंट

हेही वाचा : Met Gala : तब्बल १९६५ तास, १६३ कारागीर अन्…; मेट गालामध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज! साडीने वेधलं लक्ष

पाकिस्तानमधील या व्हायरल व्हिडीओवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडल्याने सध्या सर्वत्र संजू राठोडचं कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा : माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”

संजूने ‘गुलाबी साडी’ हे गाणं फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित केलं होतं. या गाण्याला आता कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. तर, इन्स्टाग्रामवर हे गाणं ट्रेडिंग गाण्यांच्या यादीमध्ये आहे. याआधी प्रदर्शित झालेलं संजू राठोडचं ‘नऊवारी साडी’ गाणं सुद्धा सोशल मीडियावर लोकप्रिय झालं होतं.

Story img Loader