आजकाल रोज कोणती ना कोणती मॉडेल ही सोशल मीडियावर तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल होताना दिसते. तर आता पाकिस्तानची मॉडेल आणि ‘कप्तान’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री सईदा इम्तियाज ट्रोलर्सचा शिकार झालेली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.
सईदाने तिचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत सईदाने लाल रंगाची बिकीनी परिधान केली असून ती स्विमिंग पूलजवळ असल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी सईदाला बिकीनी परिधान केली म्हणून ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “तू तुझ्या घरात काही पण करु शकते…हे जगाला दाखवण्याची गरज का वाटते तुला?” दुसरा नेटकरी म्हणाला, “काही गरज आहे का?” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “आता प्रधानमंत्री जे बोलतात ते चुकीच वाटतं यांना अश्लील लोक.” तिसरा नेटकरी म्हणाला, “ही पंतप्रधानाला कपड्यांबद्दल बोलत होती, खूप मस्त.”
View this post on Instagram
दरम्यान, सईदा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या जीवनावर असलेल्या ‘कप्तान : द मेकिंग ऑफ ए लीजेंड’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात सईदाने इमरान यांच्या पुर्वाश्रमाची पत्नी जेमिना गोल्डस्मिथची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास ६ वर्ष सुरू होतं. त्यानंतर २०१३ मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अब्दुल मन्नानने इमरान यांची भूमिका साकारली होती.