अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण या चित्रपटामधील एका सीनचा वापर चक्क रेस्तराँच्या जाहिरातीसाठी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या कराची येथील रेस्तराँने हे काम केलं आहे. आता हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण यामध्ये खरंच तथ्य आहे. या रेस्तराँच्या जाहिरातीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – “तारक मेहता…”च्या दयाबेनचा शोध संपला, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेमध्ये एण्ट्री?
काय आहे जाहिरात?
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामधील आलियाचा एक सीन खूप गाजला. आणि तो सीन म्हणजे गंगूबाई आपल्या ग्राहकांना बोलावत असते. याच सीनचा वापर कराचीमधील या रेस्तराँने केला आहे. रेस्तराँने आलियाच्या या सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेस्तराँने खास पुरुषांसाठी ऑफर ठेवली असल्याचं भलं मोठं पोस्टर दिसत आहे. तसेच त्यांनी यासाठी एक टॅगलाईन देखील तयार केली आहे.
“आजा ना राजा…अजून कशासाठी वाट पाहतो?” अशी ही टॅगलाईन आहे. रेस्तराँमध्ये येणाऱ्या केवळ पुरुषांना २५ टक्के ऑफ देण्यात आले आहेत. ही ऑफर ‘मेन्स मंडे’ अंतर्गत देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील या रेस्तराँची जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. “अगदी खालच्या दर्जाची जाहिरात”, “रेस्तराँच्या जाहिरातीसाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर हे चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटामधील सीन जाहिरातीसाठी वापरणं अपमानास्पद आहे.” अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – Photos : कधीही न पाहिलेला जान्हवी कपूरचा बोल्ड लूक, मनमोहक सौंदर्याचं होतंय कौतुक
सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना पाहून या रेस्तराँने एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याच प्रकारची माफी न मागता आपलंच कौतुक करताना ते दिसत आहे. त्यांनी म्हटलं की, “कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. ही फक्त एक कल्पना आहे. ही पोस्ट एका संकल्पनेवर आधारित आहे. आम्ही पूर्वीसारखंच प्रेमाने तुमची सेवा करण्यास हजर आहोत. मुव्ही करे तो आग रेस्तराँ करे तो पाप” सोशल मीडियावर या रेस्तॉंरविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.