Pakistani singer Haniya Aslam Passed Away: पाकिस्तानी संगीतकार व गायिका हानिया अस्लमचं निधन झालं आहे. हानियाने रविवारी (११ ऑगस्ट रोजी) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने हानियाची प्राणज्योत मालवली. हानियाची चुलत बहीण आणि म्युझिक पार्टनर झेब बंगश हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून निधनाची माहिती दिली.

झेब बंगश हिने इन्स्टाग्रामवर हानियाचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘हानिनी’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर कमेंट्स करत अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय गायक व गीतकार स्वानंद किरकिरे यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे.

Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट

ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…

हानिया पाकिस्तानातील उत्कृष्ट संगीतकारांपैकी एक होती. तिच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत. हानिया अस्लमच्या निधनाच्या वृत्ताने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

Swanand Kirkire last chat with Haniya Aslam: भारतीय गीतकार-गायक स्वानंद किरकिरे यांना हानियाच्या निधनाची बातमी कळाल्यावर त्यांनी तिच्याबरोबरच्या शेवटच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. “माझी प्रिय हानिया अस्लम आता या जगात नाही. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि काल रात्री (११ ऑगस्ट) तिचे निधन झाले. आमच्यात एक खास बॉन्डिंग होतं. आमचं काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं, ते तिच्याबरोबरचं माझं शेवटचं संभाषण मी शेअर करत आहे. आमचा एक अपूर्ण अल्बम आहे, ज्यावर आम्ही एकत्र काम करत होतो,” असं त्यांनी लिहिलं आहे.

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

स्वानंद किरकिरे यांच्या पोस्टवर मुक्ता बर्वेने हार्टब्रेकचा इमोजी कमेंट केला आहे. तर किरण रावने या दुःखद बातमीवर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. इतरही अनेक भारतीय कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करून हानिया अस्लमला श्रद्धांजली वाहिली आहे.

“थिएटरमध्ये या आणि तुमची लायकी दाखवा,” वरुण धवनच्या वडिलांनी कोणाला दिलं आव्हान? म्हणाले…

झेब-हानिया या बहिणींना कोक स्टुडिओ पाकिस्तानसाठी काही उत्तम गाणी तयार केली. त्यांचं ‘चल दिए’ हे गाणं खूप हिट झालं होतं. या गाण्यासाठी हानिया व झेब दोघींचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यांनी जगभरात अनेक ठिकाणी या गाण्याचं सादरीकरण केलं होतं.

रिपोर्ट्सनुसार, हानियाचा जन्म कराचीमध्ये झाला होता, तिने यूएस आणि यूकेमध्ये शिक्षण घेतलं आणि कॅनडामधून तिचा ऑडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. झेब आणि हानिया यांनी बँड म्हणून एकत्र काम केलं आणि जगभर प्रवास करत गाणी सादर केली. झेब व हानिया यांनी ‘हायवे’तील ‘सोहा सही’ या गाण्यासाठी एआर रहमानसह काम केलं होतं.

Story img Loader