पाकिस्तानमधील प्रसिद्ध गायिका शाझिया मंजूर यांनी कॉमेडियन शेरी नन्हा यांना लाईव्ह शोमध्ये मारलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाझिया मंझूर शेरी नन्हा यांच्यावर खूप चिडल्याचं आणि त्यांना वारंवार मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेरी असं काय म्हणाले की शाझिया मंजूर भर कार्यक्रमात इतक्या चिडल्या ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाइव्ह शो दरम्यान शेरी नन्हा शाझिया मंजूरला म्हणतात, “तुम्ही माझ्याशी लग्न केल्यास मी लगेच तुम्हाला हनीमूनसाठी मोंटे कार्लोला घेऊन जाईन. तुम्हाला कोणत्या क्लासने (विमानातील क्लास) जायचे आहे ते सांगाल का?” हे ऐकून शाझिया मंझूर प्रचंड चिडल्या आणि त्या लाइव्ह शोमध्ये शेरी नन्हा यांना नको नको ते बोलल्या. मग रागाने त्या आपल्या जागेवरून उठतात, त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, “तू थर्ड क्लास माणूस आहेस. मागच्या वेळी पण मी बोलले होते पण तेव्हा सगळ्यांना वाटलं की ती मस्करी आहे. तेव्हाही मी पण म्हटलं होतं की तू हनिमूनबद्दल बोलतोय, तुला लाज वाटत नाही का?”असं बोलून शाझिया यांनी शेरी नन्हा यांना थप्पड लगावली.

“राधिका माझ्या स्वप्नातील राणी,” अनंत अंबानींचे होणाऱ्या पत्नीबाबत विधान; वाढलेल्या वजनाबद्दलही केलं भाष्य

शोचा होस्ट मोहसीन अब्बास हैदर या भांडणात पडतो आणि भांडण थांबविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शाझिया मंजूर यांनी त्याला थांबवत “आज कोणीच पुढे येऊ नका, हनिमून म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? एखाद्या बाईशी हनिमूनबद्दल बोलतात का? मागच्या वेळीही तू असंच बोलला होतास आणि मग म्हटलं की ही मस्करी आहे, मग मीही ती मस्करी असल्याचं म्हणाले होते. गेल्यावेळीही याने गैरवर्तन केलं होतं हे लोकांना माहित नव्हतं. तेव्हाही मी त्याला खडसावलं होतं.”

आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”

हे सर्व ऐकल्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या मोहसीन अब्बास हैदरने शेरी नन्हा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि ‘शेरी, तू तुझ्यासाठी लिहिलेले संवाद बोलत जा, मनाचं काही बोलू नकोस,’ असं म्हटलं. यानंतर शाझिया मंजूर यांनी शेरी नन्हा यांना धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani singer shazia manzoor slapped comedian sherry nanha in live show over honeymoon joke video viral hrc