हरीम शाह ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉकर व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. टिकटॉक स्टार असलेल्या हरीम शाहचा एमएमएस लीक झाला आहे. खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टिकटॉकस्टारने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्टनुसार, हरीम शाहने या प्रकरणानंतर मोरोक्को या टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. “माझे काही खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत”, असा खुलासा हरीमने या मुलाखतीत केला आहे. हे व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मित्रांचा हात असल्याचा संशय हरीमने व्यक्त केला आहे. संदाल खट्टक आणि आयेशा नाझ या दोन मित्रांची नावं कॅमेऱ्यासमोर घेत हरीमने त्यांच्यावर व्हिडीओ व्हायरल केल्याचे आरोप केले आहेत.

हेही वाचा>> पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी ट्वीटरवर ट्रेंड, भाऊ शमास फोटो शेअर करत म्हणाला…

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, खासगी व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी हरीम शाह तिच्या दोन मित्रांविरोधात तक्रार दाखल करणार आहे. “काही वर्षांपूर्वी मी स्वत: माझे हे व्हिडीओ बनवले होते. खट्टक आणि आयेशाने माझ्या फोनमधून हे व्हिडीओ चोरुन ते व्हायरल केले आहेत. याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार आहे”, असं हरीम शाह म्हणाली आहे.

हेही वाचा>> “भारतात लोकशाही संकटात आहे” राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याचा संताप, ट्वीट करत म्हणाला “निर्बुद्ध माणूस…”

पाकिस्तानमधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारपैकी हरीम शाह एक आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून इन्स्टाग्रामवर हरीम शाहचे २ लाख ९६ हजार फॉलोवर्स आहेत. हरीम टिकटॉकवरही लोकप्रिय आहे. तिचे टिकटॉकवर १ लाख ८६ हजार फॉलोवर्स आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani tiktoker hareem shah nude videos goes viral social media star alleged her friends kak