पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतीय प्रेमी सचिनसाठी सीमा ओलांडून आली आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तिची चौकशी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या सीमा व सचिन या जोडप्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. दोघांना कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशातच आता सीमाला चित्रपटात काम मिळालं आहे.

पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? निर्मात्याने ऑफर दिल्यावर म्हणाली, “मी विचार…”

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagma actress link up with three married celebrities
तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली होती ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; बॉलीवूडसह दक्षिणेत केलेत अनेक सुपरहिट सिनेमे
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

‘युपी तक’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम सीमा हैदरला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमा हैदरची ऑडिशन घेतली. या चित्रपटात सीमा हैदर भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे.

“मला पाकिस्तानात परत पाठवू नका”, सीमा हैदरच्या मागणीवर योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राजस्थान येथील उदयपूरमधील शिंपी कन्हैया लाल साहूच्या हत्येवर एक ‘टेलर मर्डर स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवला जात आहे. त्या चित्रपटात सीमा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी चित्रपट निर्माते अमित जानी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल सीमाचे भगवी शाल देऊन स्वागत केले, त्यानंतर तिने अमित यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सीमा गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने एटीएसकडून तिची चौकशी केली जात होती. आता सीमा हैदर आणि चित्रपटाची टीम एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहे. एटीएसच्या अहवालानंतर सीमा चित्रपटाचे शुटिंग सुरू करेल, असं म्हटलं जात आहे.

विमानतळावर तुम्ही मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करता? समीर वानखेडे म्हणाले, “ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमित यांनी त्यांचे फिल्म प्रॉडक्शन हाऊस ‘जानी फायर फॉक्स’ या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर सीमा व सचिन या जोडप्याला दिली होती. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत चित्रपट प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. हे प्रॉडक्शन हाऊस उदयपूरमधील शिंपीच्या हत्येवर आधारित चित्रपट बनवत आहे.