छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय नुकताच तिचा एक म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत दिसली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जातं होते. यावर आता पलक तिवारीने मौन सोडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पलक तिवारीने अखेर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर वक्तव्य केलं आहे. पलक अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला म्हणाली की, “ही फक्त मैत्री आहे. या सगळ्या चर्चा होत्या आणि म्हणून मी त्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही फक्त बाहेर होतो आणि आम्ही स्पॉट झालो. तिथेच ते संपले. खरं तर, आम्ही एका ग्रुपसोबत होतो. फक्त आम्ही नव्हतो आणखी काही मित्र होते. ही एक गोष्ट होती जी लोकांना प्रचंड आवडली, पण ते सत्य नाही.”

आणखी वाचा : सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरच्या ‘Pet Puran’ ट्रेलर प्रदर्शित, पाहिलात का?

आणखी वाचा : करिश्मा कपूर पुन्हा होणार नवरी? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधान

पुढे जर ते दोघं मित्र आहेत तर ती चेहरा का लपवत होती? असा प्रश्न विचारता पलक म्हणाली, “माझी आई फोटोग्राफर्सने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ बघत मला ट्रॅक करते. त्या रात्री एक तासापूर्वी मी आईला सांगितले होते की मी घराकडे निघाले आहे. मी वांद्रे इथे असून रस्त्यात खूप ट्रॅफिक आहे, पण आम्ही तेव्हाच रेस्टॉरंटमधून निघालो होतो.”

आणखी वाचा : ऐश्वर्या आणि अभिषेकची ‘पहिली भेट’ ते प्रपोज करण्यापर्यंत, जाणून घ्या त्यांची प्यारी वाली लव्ह स्टोरी

जानेवारीमध्ये मुंबईतील वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान कारमध्ये एकत्र दिसले होते. इब्राहिम फोटोग्राफर्सना कारमधून हॅलो म्हणतं होता. तर दुसरीकडे पलक तिचा चेहरा लपवत होती. हे दोघे जेव्हा एकत्र दिसले त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. जर ते दोघे रिलेशनशिपमध्ये नाहीत तर पलक तिचा चेहरा का लपवते असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak tiwari breaks silence regarding affair with saif ali khan s son ibrahim know what he said dcp