‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासह अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात घडला. हैदराबादमधील चित्रपटाच्या सेटवर सोमवारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे ‘द व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटाचे हैदराबाद येथे शूटींग करत आहेत. या चित्रपटाचे शूटींग सुरु असताना एका वाहनाचे नियंत्रण सुटले आणि त्या वाहनाने सेटवर शूट करत असलेल्या पल्लवी जोशी यांना धडक दिली. या धडकेत त्यांना दुखापत झाली. पण त्यांनी आपला सीन पूर्ण केला आणि नंतर त्या उपचारासाठी रवाना झाल्या.
आणखी वाचा : क्रांती रेडकर ‘या’ कारणामुळे झोपते घरातील सोफ्यावर, म्हणाली “माझा नवरा…”

सुदैवाने पल्लवी जोशी यांना झालेली दुखापत गंभीर नाही. त्यांच्यावर सध्या हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे शूटींग हैदराबाद येथे सुरु आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी पल्लवी जोशींसह नाना पाटेकर, अनुपम खेर हे कलाकारही झळकणार आहेत.

आणखी वाचा : पल्लवी जोशी यांना पहिल्या भेटीत अजिबात आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री, पण…

‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी भेटीला सज्ज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी करत आहेत.

Story img Loader