बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकलले नसले तरी हे प्रकरण आता वेगळ्याच वाटेवर जाताना दिसत आहे. अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सुरजने जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईकडून करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आदित्य पांचोली आणि त्याची पत्नी झरीना वहाब यांनी जियाच्या आईविरूद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसनीचा खटला दाखल केला आहे.
आदित्य पांचोलीकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत जियाच्या आईने आपल्या कुटुंबाविरुद्ध ट्विटरवर अपमानकारक आणि बदनामीकारक मजकूर पसरवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पांचोली कुटंबीयांची समाजातील प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ९ जून रोजी करण्यात येईल. अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सुनावणीच्यावेळी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.

Story img Loader