आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. रविवारी (6 फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान नुकतंच लतादीदींच्या एका जुन्या मुलाखतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
काही महिन्यांपूर्वी लतादीदींनी एक मुलाखत दिली होती. ही त्यांची शेवटची मुलाखत असल्याचे बोललं जात आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मध्य प्रदेशातील राजा मान सिंह तोमर संगीत विद्यापीठ ग्वाल्हेरला त्यांनी मुलाखत दिली होती. प्रसिद्ध लेखक दिनेश पाठक यांनी लतादीदींशी फोनवर चर्चा करत ही मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी लतादीदींना अनेक प्रश्न विचारले होते.
“त्यांची गाणी ऐकून…”, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
‘लतादीदी १९९९ मध्ये पंडित रविशंकर जी यांना भारतरत्न देण्यात आला आणि त्यानंतर २००१ मध्ये तुम्हाला भारतरत्न देण्यात आला. हा विशेष योगायोग होता का? यावर तुम्ही काय सांगाल?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “यावर मी काय बोलणार, ते भारतरत्न नव्हे, तर ते विश्वरत्न होते. मी काहीच नाही. त्यांनी मला भारतरत्न बनवले. मला मिळालेला हा सन्मान आमच्या सरकारचे दायित्व आहे.”
‘यावर तुम्ही दोघंही आपापल्या जागेवर अद्वितीय आहात’, असे पाठक म्हणाले. यावर लतादीदी पुढे म्हणाल्या, “मी माझ्या जागी अद्वितीय आहे कारण माझा जन्म इंदौरमध्ये झाला आणि मी स्वतःला मध्य प्रदेशातील समजते. मी आणि माझी बहीण, आमच्या दोघांचा जन्मही तिथेच झाला. माझी मावशी तिथे राहायची. माझी आजीपण त्यावेळी त्यांच्या घरी आली होती, असे ऐकले आहे. सर्वजण माझ्या आईची काळजी घेत होते.”
“जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल
‘तुमचा जन्म मध्य प्रदेशात झाला. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे’, असे पाठक यांनी लतादीदींना सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, “मीही ऐकले आहे की जिथे माझा जन्म झाला, तिथे त्यांनी एक फलक लावला आहे. मध्य प्रदेशातील जनतेसाठी हा मोठा आशीर्वाद आहे. मी जेव्हा-जेव्हा येथे आली आहे, तेव्हा मला लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे.”
‘मध्यप्रदेशात दरवर्षी लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो, त्यावर तुमचे मत काय?’ यावर उत्तर देताना लतादीदी म्हणाल्या, “हो, मला माहीत आहे. अर्जुन सिंह मुख्यमंत्री असताना त्यांनी मला तुमच्या नावाने पुरस्कार द्यायचा आहे, असे सांगितले होते. मी तेव्हा म्हटलं, तुमची इच्छा. मी इंदौरला, मध्यप्रदेशला आपलं मानते. त्यामुळे जर तुम्ही माझ्या नावावर १० रुपयांचे बक्षीस दिले तर ती माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब असेल.”