छोट्या पडद्यावरील ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत ऋषिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिमरन बुधरूपने नुकताच असा धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर तरुण पिढीकडून आपल्याला सातत्याने बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तिने सांगितल आहे.
आणखी वाचा : एका आईसाठी सगळ्यात अवघड काय असतं? निवेदिता सराफ यांची पोस्ट चर्चेत
सिमरनने नुकतीच ‘ईटाइम्स टीव्ही’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सिमरने बलात्कारा आणि जीवे मारण्याच्या धमक्या आणि सोशल मीडिया ट्रोलिंग विषयी सांगितले आहे. “सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं कारण माझं जे पात्र होतं तिने अशा गोष्टी केल्या. ज्यासाठी तिला प्रेक्षक नापसंत करू लागले आणि त्यात काही नवीन नाही, पण त्यानंतर मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या आणि मग मला पोलिसांत तक्रार करणं भाग पडलं,” असे सिमरनने सांगितले.
आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’
पुढे या विषयी बोलताना सिमरन म्हणाली, “तपासात कळलं की हा एक १३ ते १४ वर्षांच्या मुलांचा ग्रुप होता. आई-वडील मुलांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून फोन घेऊन देतात, पण मुलं मात्र त्याचा गैरवापर करतात. त्यांना योग्य-अयोग्य कळत नाही आणि मग ते अशा चुका करून बसतात.”
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
या सगळ्या प्रकरणावर तिचं मत मांडत सिमरन म्हणाली, “मला वाटतं की पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं. कारण या वयात त्यांना चांगलं-वाईट कळत नाही. माझ्या बद्द्लच्या त्या अतिशय घाणेरड्या कमेंट्स वाचून मला जेव्हा कळलं की त्या या मुलांनी लिहील्या आहेत, तेव्हा मला फार वाईट वाटलं. मी माझ्या आयुष्यात खुश आहे, काम करतेय पण मला त्या लहान मुलांचे राहून-राहून वाईट वाटत. मला देखील एक लहान बहिण आहे जी त्यांच्या वयाची आहे पण तिने जर असं काही केलं तर मी तिच्यासोबत काय करेन याचा मी विचारही करु शकत नाही.”