देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. करोनाच्या संसर्गावर ताबा मिळवण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. शिवाय नागरिकांकडून या नियमांचं आणि सूचनांचं पालन होतंय का? हे पाहण्यासाठी पोलीस डोळ्यात अंजन घालून गस्त घालत आहेत. अशातच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने करोनाच्या सूचनांच पालन न केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता जिमी शेरगिल पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत होता. एका शाळेमध्ये या वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. यावेळी नाईट कर्फ्यू असतानाही रात्री आठ वाजल्यानंतर शूटिंग सुरु असल्याने पोलिसांनी सेटवर धडक दिली. यावेळी सेटवर शंबर लोक उपस्थित होते. त्यामुळे करोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमि शेरगिलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमध्ये देखील गेल्या काही दिवसात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळेच प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत.अशातही रात्री आठनंतर शूटिंग सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच अभिनेता जिमि शेरगिल करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत जमिने यासंदर्भात माहिती दिली होती. यावेळी जिमिने चाहत्यांना करोनाची लस घेण्याचं आवाहनदेखील केलं होतं. जिम्मी शेरगिल लवकरच ‘दाना-पानी 2’, ‘शरीक 2’ आणि ‘देव खरूद’ या सिनेमात झळकणार आहे.