क्रिकेटर शुबमन गिल मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्तेत आहे. कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकर यांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात. अशात काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मैदानावरील क्रिकेटप्रेमी सारा-सारा असं ओरडताना दिसले होते. त्यानंतर पुन्हा सारा आणि शुबमन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. याच दरम्यान प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीने या दोघांच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडियावर पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा आणि शुबमन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर अनेकांनी शुबमन सोनमला डेट करत असल्याचं म्हटलं होतं. पण सोनमने एक ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं. या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगतानाच तिने साराचं नाव घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोनम आणि शुबमन एकमेकांशी शेकहँड करताना दिसले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ प्रतिक्रिया देत एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमधून तिने शुबमनशी तिचा काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. सोनम बाजवाने तिच्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “ये सारा का सारा झूठ है” या ट्वीटबरोबरच तिचे खळखळून हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
सोनमचं ट्वीट पाहून शुबमनचे चाहते तो साराला डेट करत असल्याचा अंदाज लावत आहेत. काहीच्या मते शुबमन सारा तेंडुलकरला डेट करत आहे तर काहींच्या मते तो सारा अली खानला डेट करत आहे. शुभमनला सारा अली खानसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. सारा तेंडुलकरबरोबर त्याच्या मैत्रीच्या चर्चा आहेत. त्यामुळे शुबमन डेट करत असलेली सारा नेमकी कोण याबाबत चाहते संभ्रमात आहेत.