गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. त्यात लकी अली, मीनाक्षी शेषाद्री, मुकेश खन्ना आणि किरण खेर यांची नाव होती. आता त्या पाठोपाठ अभिनेते परेश रावल यांच्या निधनाच्या अफवा सुरु झाल्या. दरम्यान, आता स्वत: परेश रावल यांनी पोस्ट शेअर करत या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.

परेश रावल यांनी एक ट्वीट करत ही माहिती दिली. परेश रावल यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा स्किनशॉर्ट शेअर केला आहे. ‘या पोस्टमध्ये १४ मे २०२१ रोजी परेश रावल यांचे सकाळी ७ वाजता निधन झाल्याचे लिहिले आहे.’ पुढे आणखी लिहण्यात आले की ‘सांगताना अत्यंत दु:ख होतं आहे की परेश रावल जी आता आपल्यासोबत नाही.’ ही पोस्ट शेअर करत “मी सकाळी ७ वाजता झोपलो या गैरसमजांबद्दल क्षमस्व …!”, अशा आशयाचे ट्वीट करत परेश रावल यांनी ते सुखरुप असल्याचे सांगितले आहे. त्यांचे हे ट्वीट पाहुन त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर, त्यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी करोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर अवघ्या १८ दिवसांनी परेश रावल यांना करोनाची लागण झाली होती.

आणखी वाचा : “राधे पाहण्यापेक्षा करोनाने मरणे चांगले”, चित्रपट पाहताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल

परेश रावल यांची ‘हेरा फेरी’ आणि ‘हेरा फेरी २’ या चित्रपटातील बाबुरावच्या भूमिकेने सगळ्यांनी मने जिंकली. बाबुरावची धमाल कॉमेडी प्रेक्षकांच्या अजून ही लक्षात आहे. तर, परेल रावल हे लवकरच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात दिसणार आहेत.