अभिनेते आणि भाजपचे खासदार परेश रावल यांना मुंबई विमानतळावर एका त्रासदायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. विमानतळावरून बाहेर आल्यानंतर फोनवर बोलत असलेल्या परेश रावल यांचे लक्ष नसताना त्यांच्याजवळ येऊन एका अतिउत्साही चाहत्याने सेल्फी टीपण्याचा प्रयत्न केला. परेश रावल यांना ते अजिबात आवडले नाही. त्यांनी संतापात सेल्फी टीपण्याचा प्रयत्न करणाऱया चाहत्याला अक्षरश: ढकलून दिले आणि तिथून निघून जाणे पसंत केले.
बॉलीवूड कलाकारांना लोकप्रियतेचे वलय असल्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी आणि सध्याच्या स्मार्ट जगात आपल्या स्मार्टफोनवरून सेल्फी टीपण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यात काही अतिउत्साही चाहत्यांच्या त्रासाला कलाकारांना सामोरे जावे लागते. परेश रावल यांच्यासोबत देखील तेच झाले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर परेश रावल बराच वेळ एकटेच उभे होते. कदाचित ते आपल्या वाहन चालकाला शोधत होते आणि तो जवळपास नसल्याने ते रागावलेले वाटत होते. ते सारखे आपला फोन काढून मोबाईलवर बोलत होते. दरम्यान, एका चाहत्याने परेश रावल यांना न विचारता नकळत त्यांच्या जवळ येऊन सेल्फी टीपण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या परेश रावल यांनी त्याला सरळ ढकलून दिले आणि तेथून निघून गेले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2016 रोजी प्रकाशित
परेश रावल यांच्याकडून चाहत्याला धक्काबुक्की
बॉलीवूड कलाकारांना लोकप्रियतेचे वलय असल्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 18-05-2016 at 10:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh rawal pushes aside pesky fan trying to take selfie