लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज पार पडत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत असताना अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला मौलिक अधिकार आहे, असे सांगताना रावल म्हणाले, “सरकारने हे केले नाही, ते केले नाही, असा नेहमीच आरोप लोकांकडून होत असतो. पण तुम्ही जर आज मतदान केले नाही, तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, सरकार नाही.”

मतदानाच्या अधिकाराबाबत बोलत असताना मतदान न करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, असेही त्यांनी सुचविले. “जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना काही ना काही तरी शिक्षा दिलीच पाहीजे. एकतर त्यांच्यावरील कर वाढवावा किंवा इतर काहीतरी तरतूद करावी”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”
फोटो-आमश्या पाडवींचा व्हिडिओ(फोटो -Maharashtra AssemblyLive)
Aamshya Padavi : VIDEO : आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? आमश्या पाडवी यांनी स्वत:च सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबई सारख्या शहरात कोट्यवधी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली होती. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांनी गैरसोयीबाबत तक्रारी व्यक्त केल्या. ईव्हीएममध्ये बिघाड, वीजपुरवठा खंडीत होणे, अशा अनेक समस्या मुंबईकरांना मतदानाबाबत भेडसावत होत्या.

दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या सहा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे या मतदारसंघातही मतदान होत आहे.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक ४८ लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण ८.९५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ४.६९ कोटी पुरुष आणि ४.२६ कोटी महिला मतदार आहेत. तर ५४०९ तृतीयपंथी मतदार आहेत. पाचव्या टप्यात एकूण ६९५ उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद झाले आहे.

Story img Loader