बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिचा वाढदिवस ‘दावत-ए-इश्क’च्या सेटवर साजरा केला. यावेळी चित्रपटातील कलाकार अनुपम खेर आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. पण, परिणीती पूर्ण दिवस चित्रपटाच्या चित्रीकरणातच व्यस्त असणार आहे. त्यामुळे ती वाढदिवसाचा काही खास आनंद लुटू शकणार नाही.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत असलेल्या परिणीतीचा आज २५ वा वाढदिवस आहे. सहकलाकार अनुपम खेर, आदित्य रॉ़य कपूर, करण वाही आणि दिग्दर्शक हबीब फैजल यांनी मध्यरात्री केक आणून तिला आश्चर्यचकित केले. अनुपम यांनी परिणीतीसाठी आणलेल्या केकचा फोटोही ट्विट केला आहे.

Story img Loader