बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या पती निक जोनससोबत असल्याचे दिसत आहे. त्याचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियांकाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका निकसोबत दिसत आहे. प्रियांकाने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर तिच्या पाठी चाकू आणि काटा घेऊन असल्याचे दिसत आहे. या फोटोवर कमेंट करत परिणीतीने प्रियांकाला ट्रोल केलं आहे. ‘प्रियांका ताई, तुमचं हे काय चाललं आहे? इन्स्टाग्रामवर कुटुंबातील माणसंदेखील आहेत, डोळे बंद करत फोटोला लाइक करण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशी कमेंट परिणीतीने केली आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : BB OTT : शमिताच्या हॉटनेसवर करणने विचारला प्रश्न, राकेश म्हणाला…
दरम्यान, प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात सेलिन डायोन आणि सॅम ह्यूघन मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय ती ‘मॅट्रिक्स ४’ आणि अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.