बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनासचं लग्न नुकतंच जोधपुरमध्ये पार पडलं. या लग्नात निककडून तब्बल ३७ कोटी रुपये मागण्याऱ्या परिणितीला निकनं खरचं ३७ कोटी दिलेत का? याचं कुतूहत तिच्या चाहत्यांना होतं. अखेर परिणितीनं ट्विट करत निक किती उदार आहे, असं सांगत त्याचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबी लग्नात ‘जुता छुपाई’ची पद्धत असतं. यावेळी नवऱ्यामुलाच्या चपला नवरीच्या बहिणी लपवतात. त्याबदल्यात नवऱ्यामुलाकडून पैसे किंवा भेटवस्तू मागितली जाते. या पद्धतीपासून पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या निकला परिणितीनं या पद्धतीची कल्पना दिली. याबदल्यात निकनं तिला ३७ कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं असंही परिणिती म्हणाली होती. तेव्हा निकनं खरंच परिणितीला ३७ कोटी दिलेत का हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र निकनं तिला ३७ कोटी न देता ५ लाख रुपये दिल्याचं समजत आहे.

परिणीतीनं जरी निकनं काय भेट दिली हे सांगितलं नसलं तरी तो खूपच उदार आहे. त्यानं आम्हाला आश्चर्याचा खूप मोठा धक्का दिला असून मी अजूनही आनंदात आहे असं ट्विट तिनं केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra on joota chhupai