बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही ‘किल दिल’, ‘दावत-ए-इश्क’ आणि ‘हसी तो फसी’ या बॉक्स ऑफिसवर न चाललेल्या चित्रपटांनंतर कुठे गायबचं झाली आहे. पण तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटपटू धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात परिणीती ही धोनीची पत्नी म्हणजेच साक्षी रावतच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत हा धोनीची भूमिका साकारतोय.
काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर हे धोनीचे वडिल पान सिंग यांची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले होते. नीरज पांडे दिग्दर्शित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ ची कथा धोनीचे जीवन, कुटुंब आणि करियर यावर आधारित आहे. नीरज आणि अनुपम यांचा हा एकत्र चौथा चित्रपट असून, यापूर्वी त्यांनी ‘अ वेनस्डे’, ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’मध्ये एकत्र काम केले होते.
आणखी वाचा