बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परिणीती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या परिणीती तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती समुद्रात असल्याचे दिसत आहे. परिणीती समुद्रात अंडर वॉटर स्विमिंग करत आहे, तर तिच्या आजुबाजूला मासे दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘माझं मेडिटेशन’ असं कॅप्शन परिणीतीने दिलं आहे.

आणखी वाचा : सैफने सांगितले होते अमृताशी घटस्फोट आणि करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण

या आधी परिणीतीने तिचe एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत परिणीतीने पिवळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. तिचा हा बोल्ड लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला होता.

आणखी वाचा : “तुझी रेखा मॉं…”, बच्चन घराण्याच्या सुनेला रेखा यांनी लिहिले होते ‘खास’ पत्र

दरम्यान, परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या व्यतिरिक्त संदीप और पिंकी फरार या चित्रपटात परिणीती दिसली होती. या चित्रपटात परिणीतीसोबत अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता.

Story img Loader