बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या जकार्तामध्ये सुट्ट्यांची आनंद लुटत आहे. जकार्तामध्ये विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासह परिणीतीने शॉपिंग देखील केली. जकार्तामध्ये शॉपिंग करत असताना परिणीतीने चक्क १० लाखांमध्ये फक्त दोन शर्ट खरेदी केले. मॉलमधील कॅश काऊंटवर मशीनसोबतचे छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर करून परिणीतीने दहा लाखांमध्ये दोन शर्ट खरेदी केल्याचे म्हटले आहे. कॅश काऊंटवरील मशिनवर परिणीतीचे बिल तब्बल १०,८७,७०० रुपये झाल्याचेही दिसते. मात्र, यामागे परिणीतीचा ‘स्मार्टनेस’पणा दडलेला आहे.
परिणीतीने इंडोनेशीतील जकार्तामध्ये शॉपिंग करत होती. तेथील चलनाचे १० लाख म्हणजे भारतीय रुपयानुसार ४,७०० इतकी किंमत होते. त्यामुळे परिणीतीसाठी ही काही जास्त किंमत नाही. त्यामुळे खरं पाहता परिणीतीने दोन शर्ट १० लाखांत नाही तर ४,७०० रुपयांमध्ये खरेदी केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा