‘मेरी प्यारी बिंदू’ या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला अभिनेत्री परिणिती चोप्राने सुरुवात केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुरानाही दिसणार आहे. सुमारे दोन वर्षांनंतर परिणिती चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण करते आहे.


स्वतः परिणिती चोप्राने नव्या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिलीये. कोलकातामध्ये या चित्रपटाचे शुटिंग करण्यात येते आहे. आयुषमान खुराना लवकरच शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटात पहिल्यांदाच आयुषमान खुराना बंगाली व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. अक्षय रॉय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Story img Loader