बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपला ‘किल दिल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांची विश्रांती घेण्याच्या विचारात आहे. पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी करारबद्ध होण्यापूर्वी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱया किल दिल चित्रपटावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत पुढील कोणत्याही चित्रपटासाठी करारबद्ध होणार नसल्याचे परिणीती म्हणाली. तसेच ‘किल दिल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विश्रांती घेणार असून जवळपास आठ-नऊ महिने आपल्या चाहत्यांना मी पडद्यावर दिसणार नसल्याची शक्यता आहे, असेही ती पुढे म्हणाली.
सध्या अनेक पटकथा वाचत असल्याचीही माहिती परिणीतीने यावेळी दिली पण, ‘किल दिल’ चित्रपटातील आपल्या भूमिकेवरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच आगामी काळात कोणता चित्रपट करावा हे ठरविण्याचा निर्णय घेणार असल्याचे परिणीतीने सांगितले.
दरम्यान, ‘किल दिल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर परिणीती आपल्या कराची आणि दुबई येथील मित्रपरिवारासोबत दोन आठवड्यांसाठी पर्यटनाला जाणार असल्याचे समजते.

Story img Loader