गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर श्रीलंकेची गायिका योहानीचं गाणं ‘माणिके मगे हिते’ हे गाणं व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्ती या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीने या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला होता. आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत परिणीती गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. गाडी चालवताना कोणालाही गाणं ऐकायला आवडते. त्याच प्रमाणे परिणीती ‘माणिके मगे हिते’ हे गाणं ऐकत आहे. या व्हिडीओत परिणीतीने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘मला जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा मी माझी गाडी चालवते. जे फार क्वचितच होतं कारण मी जास्त वेळ विमानात असते. सोबतच मुलांपेक्षा मुली चांगली गाडी चालवतात. हे गाणं योहान म्युझिकचं आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : शांतीच्या शोधात सारा अली खान पोहोचली लडाखला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani (@arjunbijlani)

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

परिणीती आधी म्युझिक कंम्पोझर यशराज मुखाते ज्याने ,’रासोडे में कौन था?’ या डायलॉगचा म्युझिक व्हिडीओ केला होता. त्याने देखील हे गाणं गायलं आहे. हे गाणं योहानीने २२ मे रोजी तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. त्यानंतर हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. फक्त श्रीलंकेतच नाही तर भारतासोबत इतर देशांमध्ये ही हे गाणं खूप व्हायरल झाला आहे.

Story img Loader