यशराज बॅनरचा परिणीती आणि सुशांत सिंग राजपूत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट सहजीवन (लिव्ह इन रिलेशनशीप) नातेसंबंधांवर आधारित होता.
य़ा बॅनरचा आगामी चित्रपट ‘दावत-ए-इश्क’ अधिक गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. भारतातील हुंडा प्रथेवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संदेश असणार आहे, पण हा उपदेश नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोरंजनाचा भाग लक्षात घेता कथेतून हुंडा प्रथेचा मुद्दा समोर आणाला जाणार आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये एका जयपूरस्थित मुलीची भूमिका केल्यानंतर आता परिणीती हैद्राबादी मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिने अनुपम खेर यांच्यासोबत काही मनोरंजक दृश्ये केली असून, ते परिणीतीच्या वडिलांची भूमिका यात साकारणार आहेत. आदित्य कपूरही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हैद्राबादमध्ये एक महिना चित्रीकरण केल्यानंतर आता लखनौ येथे चित्रपटाचे काम सुरु आहे.

Story img Loader