सैफ अली खानची लाडकी लेक आणि अभिनेत्री सारा अली खान मागच्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. सारा आणि क्रिकेटपटू शुबमन गिल यांचा डिनर डेटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे साराचं नाव शुबमनशी जोडलं जातंय. अशातच आता एका व्यक्तीने साराला तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत असून यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा अली खान लवकरच Amazon MiniTV च्या कॉमेडी शो ‘केस तो बनाता है’ मध्ये पाहुणी म्हणून दिसणार आहे. निर्मात्यांनी आता या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये सारा तिच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री “मी जेलमध्ये गेले तर मला बेल (जामीन) मिळेल. मी फेल होणार नाही,” असं म्हणताना दिसत आहे. तर कॉमेडियन परितोष त्रिपाठी तिच्यावर कारवाईची मागणी करत आहे.

सारा अली खानच्या आधी या शोमध्ये शाहिद कपूर, विकी कौशल, पंकज त्रिपाठी, सारा अली खान, अनन्या पांडे आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याशिवाय या शोमध्ये अनिल कपूर, करण जोहर, करीना कपूर, रोहित शेट्टी आणि वरुण धवनपासून ते संजय दत्तपर्यंतच्या सेलिब्रिटींचा समावेश असेल. शो ‘केस तो बनाता है’ चा हा भाग Amazon Mini TV वर प्रसारित केला जाईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paritosh tripathi demands to send sara ali khan in jail case to banta hai video viral hrc