चित्रपटात पॅरोडी गीत हा प्रकार नवा नाही, कोणत्याही भोषेतील चित्रपटात ते दिसते. पण सतिश राजवाडेसारखा दिग्दर्शक त्यात काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो.
‘पोपट’च्या ध्वनिफित प्रकाशनाच्या वेळी तो सांगत होता, चित्रपटातील तीनपैकी एक युवक म्हणजे अमेय वाघ सुपर सटार बनण्याचे स्वप्न पाहतो. त्यात तो आपण हिंदीतले बडे हीरो झालो आहोत असे पाहतो. पण हे साकारताना त्याची फक्त रुपे हिंदी चित्रपटाच्या नायकाची आहेत, गाणे मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहे, तसे करण्यातच खरी गंमत आहे असे मला वाटले. त्याच्या जोडीला उर्मिला कानेटकर हिची निवड केली आणि हे दोघे राज कपूर-नर्गिस, अमिताभ-किमी काटकर, सलमान खान-सोनाक्षी सिन्हा यांच्या रूपात दाखवलेत. या दोघांनीही हे सगळे छान अुनभवले आहे. आता प्रेक्षकांकडून या ‘पोपट’चे कसे स्वागत होते याकडे माझे लक्ष आहे, सतिश राजवाडे म्हणाला.

Story img Loader