अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने तुफान कमाई केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील काही सिग्नेचर स्टेप्स आणि गाण्यांची क्रेझही तर लोकांमध्ये अजूनही आहे. पुष्पाची दाढीवरून हात फिरवण्याची स्टाईल, त्याचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावरचा लंगडत केलेला डान्स ते ‘सामी सामी’ गाण्यात समंथाच्या जबरदस्त स्टेप्स वर्षभरानंतरही लोकप्रिय आहेत.
दरम्यान, २०२२ मध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘पुष्पा’ चित्रपट ट्रेंड करत होता. गुगलने आता ‘सर्च २०२२’ ची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत श्रीवल्लीला गाण्याने टॉप १०मध्ये स्थान मिळवलं आहे. तर पहिला क्रमांक पसूरीने पटकावला आहे. ‘हम टू सर्च: टॉप गाणी’ सेक्शन्समध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचं ‘श्रीवल्ली’ गाणं १० व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा –‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
२०२२ वर्ष सरत असताना गुगलने वर्षभरातील सर्च लिस्ट जाहीर केली आहे. यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा: द राइज’मधील श्रीवल्लीला ‘हम टू सर्च: टॉप’ गाण्यांच्या यादीत १०व स्थान मिळालं आहे. हे गीत सिड श्रीरामने तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये गायलं होतं. तर जावेद अलीने त्याचं हिंदी व्हर्जन गायलं होतं.
या यादीत अली सेठीचे ‘पसूरी’ गीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर दुसरं स्थान बीटीएसच्या ‘बटर’ गाण्याने पटकावलं आहे. यादीतील इतर गाण्यांमध्ये आदित्य ए चे ‘चांद बालियां’, इमॅजिन डॅगन्सचे ‘बिलीव्हर’ आणि बॅकस्ट्रीट बॉईजच्या ‘एव्हरीडे’ यांचा समावेश आहे.