लुका छुपी’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटु की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा २’ यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘पती, पत्नी और वो’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. १० जानेवारी २०२० रोजी चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

१९७८मध्ये हिट ठरलेल्या ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येत आहे. या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहे. १९७८साली संजीव कुमार यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आता याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.

टी-सिरिझ आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. कथेत फक्त काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट बी.आर.चोपडा यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या रिमेकची जबाबदारी मुदस्सर अजीज यांनी स्वीकारली आहे. तर जुनो चोपडा आणि अभय चोपडा टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार आहे.या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदस्सर अजीज ‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Story img Loader