‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिध्द असलेला हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचे सात महिन्यांपूर्वी एका कार अपघातात निधन झाले. वडिलांच्या अपघाती मृत्यूने पॉल वॉकरची मुलगी मेडो खूप व्यतिथ झाली होती. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. आता ती धक्क्यातून सावरलेली असून, तिने इन्स्टाग्रामवर स्वत:चे छायाचित्र प्रसिध्द केले आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दुखातून आपण सावरल्याचे दर्शविण्यासाठी १५ वर्षीय मेडोने सदर माध्यमाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधल्याचे ‘हॅलो’ मासिकाने म्हटले आहे. ‘ग्लॅड टू बी हॅपी’ असा संदेश असलेल्या ह्या छायाचित्रात ती आनंदी दिसते. प्रिंटेड बिकनी आणि डोक्यावर गॉगल असलेली मेडो खचितच सुंदर दिसते. चाहत्यांनी तिच्यावर शुभसंदेशाचा वर्षाव केला आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच ती सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मेडोने इन्स्टाग्रामवर खाते उघडले असून, येथे स्व:तचे शेअर केलेले हे तिचे तिसरे छायाचित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा