टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार हितेन तेजवानी आता अक्षय कुमारसोबत ‘इट्स एन्टरटेनमेंट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हितेनची छोटी भूमिका असून त्याच्या चित्रीकरणाससुद्धा सुरुवात झाली आहे. सदर चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांच्यासोबत असलेल्या आपल्या संबंधामुळे आपण हा चित्रपट करत आहोत, असे हितनने सांगितले. चित्रपटात अक्षय कुमारसोबत हिम्मतवाला चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. लेखक साजीद-फरहाद या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत यापूर्वी त्यांनी बोल बच्च्न, हाउसफूल २, रेडी, गोलमाल रिटर्न्स आणि गोलमाल ३ या चित्रपटांकरीता संवाद लिहीले आहेत.
छोट्या पडद्यावर हितेनचे काम नेहमीच नावाजले गेले आहे. सध्या तो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम करत असून गुन्हेगारीवर आधारित ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचा सूत्रधारही आहे.