तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या यशस्वी फिल्मी करिअरनंतर आता त्यांनी राजकारणात नवीन इनिंग सुरू केली आहे. जनसेना पक्षाचे संस्थापक आणि नेते पवन कल्याण हे निवडणूक जिंकून उपमुख्यमंत्री झाले आहेत. भाऊ चिरंजीवींच्या आशीर्वादाने त्यांनी आपला नवीन प्रवास सुरू केला आहे. याच निमित्ताने पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

पवन कल्याण यांनी केली तीन लग्नं

पवन कल्याण यांनी एक-दोन नव्हे तर तीन लग्नं केली. त्यांचं वैवाहिक आयुष्य चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांच्या पहिल्या पत्नीने तर घटस्फोटासाठी कोर्टात खेचलं होतं. पहिलं लग्न मोडल्यावर त्यांनी एका अभिनेत्रीशी दुसरं लग्न केले, पण ते लग्नही टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. तिसऱ्यांदा पवन कल्याण रशियन मॉडेलच्या प्रेमात पडले. पवन कल्याण यांच्या तिन्ही पत्नींबद्दल जाणून घेऊयात.

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

पहिल्या पत्नीला दिली होती पाच कोटींची पोटगी

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी पवन कल्याण यांची नंदिनी नावाच्या मुलीशी भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झालं. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर वर्षभरात पवन कल्याण यांनी नंदिनीशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या नात्यात प्रचंड चढ-उतार आले. नातं अपयशी ठरलं आणि दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. घटस्फोट न घेता पवनने आपल्या चित्रपटातील अभिनेत्री रेणू देसाईशी लग्न केल्याचा आरोप करत नंदिनी पवन कल्याणविरोधात न्यायालयात पोहोचली होती. पण आपण लग्न केलं नसून रेणू देसाईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं पवन कल्याण यांनी न्यायलायता सांगितलं. नंतर अभिनेत्याने नंदिनीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. नंदिनीने पाच कोटींची पोटगी घेऊन घटस्फोट दिला होता.

आमदारकीला पराभूत ते आता थेट उपमुख्यमंत्री! अभिनेता पवन कल्याण यांनी कसा उभारला नवा पक्ष?

अभिनेत्री रेणू देसाईशी दुसरं लग्न

२००८ मध्ये पहिली पत्नी नंदिनीपासून विभक्त झाल्यानंतर २००९ मध्ये पवण कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाईशी दुसरं लग्न केलं. रेणू आणि पवनमध्ये सर्व काही ठीक होतं पण नंतर कौटुंबिक कारणांमुळे नातं बिघडलं. पवन आपल्या भावाला आर्थिक मदत करत होते आणि रेणुला ते आवडत नव्हतं. अशातच एकदा ती चिडून आई-वडिलांच्या घरी निघून गेली आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटानंतरही दोघांनी चित्रपटात एकत्र काम करणे सुरूच ठेवले. रेणू आणि पवन कल्याण यांना अकिरा नंदन नावाचा मुलगा आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

रशियन आहे पवण कल्याण यांची तिसरी पत्नी

दोन घटस्फोटानंतर पवन कल्याण यांची भेट रशियन मॉडेल आणि अभिनेत्री ॲना लेझनेवा हिच्याशी झाली. दोघे चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि शूटिंगदरम्यान जवळ आले आणि घटस्फोटाच्या एका वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी लग्न केलं. मागच्या वर्षी या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण आता दोघेही एकत्र आनंदी आहेत. पवन यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अॅना त्यांचं स्वागत करताना दिसली होती.

Story img Loader