Pawan Kalyan’s wife Anna Lezhneva graduated: तेलुगू सुपरस्टार व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या तिसऱ्या पत्नी ॲना लेझनेवाने पदव्यूत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पत्नीच्या या आनंदात पवन कल्याणदेखील सहभागी झाले. या दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही व्हिडीओ शेअर करून ॲना लेझनेवा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्नी ॲना लेझनेवा यांनी नुकतीच नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली आहे. पत्नीच्या या खास पदवीदान समारंभात पवन कल्याण सहभागी झाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ॲना लेझनेवा पदवी घेताना दिसत आहेत. या खास कार्यक्रमासाठी त्यांनी निळ्या रंगाचा गाऊन घातला होता.

Video : चार दिवसांनी तिशा कुमारवर अंत्यसंस्कार, आई-वडिलांना अश्रू अनावर; रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली

पदवीदान समारंभातील व्हिडीओ शेअर करत चंद्रबाबू नायडू यांनी लिहिलं, “ॲना लेझनेवा यांनी सिंगापूर युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. तुमची उल्लेखनीय कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. खासकरून आंध्र प्रदेशातील त्या बहिणी आणि मुलींसाठी ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण घेऊ इच्छित आहेत.”

पवन कल्याण व ॲना यांची लव्ह स्टोरी

पवन कल्याण व ॲना दोघे चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि शूटिंगदरम्यान जवळ आले आणि दोघांनी २०१३ मध्ये लग्न केलं, ते पोलेना आणि मार्क या दोन मुलांचे पालक आहेत. ॲना पवन कल्याण यांची तिसरी पत्नी आहेत.

Pawan Kalyan's wife Anna Lezhneva graduated
पवन कल्याण व त्यांची पत्नी ॲना लेझनेवा (फोटो सौजन्य: PawanKalyan Addicts/Instagram)

पवन कल्याण यांच्या आधीच्या दोन पत्नी

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी पवन कल्याण यांची नंदिनी नावाच्या मुलीशी भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झालं. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर वर्षभरात पवन कल्याण यांनी नंदिनीशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या नात्यात प्रचंड चढ-उतार आले. नातं अपयशी ठरलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. २००८ मध्ये पहिली पत्नी नंदिनीपासून विभक्त झाल्यानंतर २००९ मध्ये पवण कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाईशी दुसरं लग्न केलं. पवन आपल्या भावाला आर्थिक मदत करत होते आणि रेणुला ते आवडत नव्हतं. याच कारणाने २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर पवन कल्याण यांनी ॲना यांच्याशी लग्न केलं.

Story img Loader